ई-श्रम कार्ड
घरबसल्या ई-श्रम कार्ड ऑनलाईन तुमच्या मोबाईलवरून काढा e shram card online registration process maharashtra https://eshram.gov.in/indexmain नमस्कार मित्रांनो, आज आपण केंद्र शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या ई-श्रम कार्ड (E-Shram Card) योजनेबद्दलची थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. E-Shram कार्ड काय आहे, याचे कोणकोणते फायदे आहेत, कोणत्या व्यक्तीला ई-श्रम कार्ड काढता येतो, यासाठी कोणती कागदपत्र लागतात, अर्ज कसा करावा या संपूर्ण गोष्टीची माहिती आपण सोप्या पद्धतीने जाणून घेणार आहोत. भारतात मोठ्या प्रमाणावर असंघटित कामगार काम करतात विशेष करून महाराष्ट्रामध्ये कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. या सर्व बाबीचा विचार करता शासनाकडून असंघटित कामगारांना विशेष सवलती व ओळख देण्यासाठी e shram card online registration process maharashtra संकल्पना विकसित करण्यात केली. यापेक्षाही सोप्या भाषेत सांगायचं झालं, तर ई-श्रम कार्ड हे आपल्यासारख्या असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी शासनाकडून दिलेल एक ओळखपत्र आहे, अस आपण समजू शकतो. जी व्यक्ती शेतात काम करतात, इतरां...