Income Certificate: उत्पन्न दाखला कसा काढायचा ?
Income Certificate: उत्पन्न दाखला कसा काढायचा ?
शासन समाजातल्या विविध घटकांसाठी त्यांच्या सुधारणेसाठी वेगवेगळ्या योजना राबवत असते. अशा योजनांसाठी अर्ज करायचा असल्यास ‘उत्पन्नाचा दाखला’ (Income Certificate) खूप आवश्यक असतो. उत्पन्नाचा दाखला १ वर्ष आणि ३ वर्ष या दोन प्रकारात काढता येतो. दोन्ही प्रकारच्या दाखल्याची वैधता चालू आर्थिक वर्षापुरतीच मर्यादित असते. (१ एप्रिल ते ३१ मार्च या कालावधीत काढलेला उत्पन्नाचा दाखला ३१ मार्च पर्यंतच वैध असतो.) उत्पन्नाचा दाखला शैक्षणिक, वैद्यकीय, प्रकरण इ. कारणांसाठी काढावा लागतो. Non Creamy-Layer प्रमाणपत्र काढण्यासाठी ३ वर्ष या प्रकारचा उत्पन्नाचा दाखला काढावा लागतो. सदरील लेखात आपण तलाठी उत्पन्न दाखला कसा काढायचा ? उत्पन्न दाखला काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती ? याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. Talathi Income Certificate Form PDF म्हणजेच Talathi utpanna dakhla Form PDF यांचे PDF व Word दोन्ही नमुने येथे मिळतील.
उत्पन्न दाखला कसा काढायचा ?
तलाठी उत्पन्न दाखला काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
- विहित नमुन्यातील अर्ज (तलाठी उत्पन्न दाखला अर्ज येथून Download करा. PDF File )
- शिधापत्रिका (रेशनकार्ड)
- आधार कार्ड.
- प्रकरण निहाय लागू असणारे इतर पुरावे –
- कुटुंबातील ज्या व्यक्तीच्या नावे जमीन आहे, त्यांचा जमिनीचा ८ अ, ७/१२ उतारा.
- आयकर विवरण पत्र.
- वेतन धारकांसाठी नमुना नंबर १६ ( सरकारी व निमसरकारी अधिकारी / कर्मचारी यांचे साठी)
- पेन्शनर असल्यास बँकेचे वार्षिक प्रमाणपत्र. इत्यादी.
तहसीलदार उत्पन्न दाखला काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
- विहित नमुन्यातील अर्ज
- शिधापत्रिका (रेशनकार्ड)
- आधार कार्ड.
- तलाठी यांचे कडून मिळालेला उत्पन्नाचा दाखला.
- संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी (डोल प्रकरण) २१,०००/- रुपये उत्पन्नाचा दाखला काढायचा असल्यास गाव कामगार तलाठी यांचे शिफारस पत्र जोडावे.
अर्ज कसा करावा?: Income certificate application process
महाराष्ट्र राज्यात उत्पन्न दाखला काढण्यासाठी खालील दोन पद्धती वापरतात.
- जवळच्या महा-ई-सेवा केंद्राला भेट द्या. सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करा. केंद्रचालक आपल्याला दाखला मिळून देतील.
- स्वतःचा दाखला स्वतः काढू शकता. त्यासाठी खालील पद्धत वापरा.
- अधिकृत संकेतस्थळावर जा.
- नवीन युजर नोंदणी करा. (‘नवीन युजर ? येथे नोंदणी करा’ या tab मध्ये) (नवीन असाल तर)
- आपले युजर आयडी व पासवर्ड वापरून लॉगीन करा.
- विभाग महसूल (Revenue), उपविभाग महसूल सेवा (Revenue Services) मध्ये (मिळकतीचे प्रमाणपत्र ) Income Certificate हा पर्याय निवडा व पुढे जा (Proceed) येथे क्लिक करा. (किंवा Search Bar मध्ये Income Certificate शोधावे.)
- पुढे जाऊन ‘सर्व्हिस लिस्ट’ पर्याय निवडा व त्यात ‘Income Certificate’ पर्याय निवडा. (Dashboard या पर्यायामध्ये आपण केलेले अर्ज , त्यांची सद्यस्थिती व मंजूर अर्ज पहावयास मिळतात.)
- ‘पुढे जा’ पर्यायावर क्लिक करा व तेथे सांगितल्या प्रमाणे अर्ज भरा व कागदपत्रे उपलोड करा. १ ते १५ दिवसांत आपल्या दाखल्यास तेहसिलदार कार्यालयातून मंजुरी मिळेल.
- Dashboard या पर्यायामध्ये जाऊन आपले मंजूर झालेले Income Certificate download करा.
अधिकृत शासकिय संकेतस्थळ : aaplesarkar.mahaonline.gov.in
स्त्रोत :
शासन निर्णय : संकीर्ण १/२०१२/प्र.क्र.१८/ई-१, दिनांक ३१ मार्च, २०१२.
Comments
Post a Comment