Posts

Showing posts from June, 2026

राज्यात ‘लेक लाडकी योजना’ | Lek Ladki Yojana

 महाराष्ट्रात  मुलींचा जन्मदर वाढविणे, लिंग निवडीस प्रतिबंध करणे, मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे, मुलींच्या आरोग्याचा दर्जा वाढविणे अशी अनेक उद्दिष्ट घेऊन  ‘लेक लाडकी योजना’ | Lek Ladki Yojana ही योजना राबविण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे यासाठी दिनांक १ ऑगस्ट २०१७ पासून माझी कन्या भाग्यश्री (सुधारित) नविन योजना संदर्भाधीन दिनांक १ ऑगस्ट, २०१७ च्या शासन निर्णयान्वये लागू करण्यात आली आहे. सदर योजनेस मिळणारा अपुरा प्रतिसाद विचारात घेऊन, सदर योजना अधिक्रमित करुन मुलींच्या सक्षमीकरणा करिता नवीन योजना लागू करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते. त्यानुषंगाने सन २०२३ - २४ च्या अर्थसंकल्पिय भाषणामध्ये मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही नवीन योजना सुरु करण्यात येईल. पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर टप्प्याटप्यामध्ये अनुदान देण्यात येऊन लाभार्थी मुलींचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये रोख देण्यात येतील." अशी घोषणा करण्यात आलेली आहे. त्यास अनुसरून राज्या...

ITR efiling

Image
नवीन अकाउंट उघडण्याची स्टेप-बाय-स्टेप पद्धत Income Tax e-Filing Portal वर जा.  https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/pre-login/register Income Tax e-Filing Portal वर जा. Register वर क्लिक करा: होमपेजच्या उजव्या बाजूला वरती दिलेल्या 'Register' या बटनवर क्लिक करा. PAN व्हॅलिडेट करा:  Register as a Taxpayer हा पर्याय निवडून तुमचा PAN नंबर टाका आणि 'Validate' वर क्लिक करा.  जर तुम्हाला वैयक्तिक अकाउंट उघडायचे असेल, तर "Register as Individual Taxpayer" वर 'Yes' करा आणि 'Continue' वर क्लिक करा. वैयक्तिक माहिती भरा (Basic Details):तुमच्या PAN कार्डवर असल्याप्रमाणे तुमचे नाव (पहिले नाव, आडनाव), जन्मतारीख, लिंग आणि रेसिडेन्शियल स्टेटस (Resident) निवडा आणि 'Continue' करा. संपर्काची माहिती द्या (Contact Details):तुमचा मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि सध्याचा पत्ता अचूक भरा, त्यानंतर 'Continue' वर क्लिक करा.  (टीप: स्वतःचाच मोबाईल नंबर आणि ईमेल वापरा कारण यावर OTP येईल).OTP व्हेरिफिकेशन (OTP Verification):तुम्ही दिलेल्या मोबाईल नंबर आ...