पीएम किसान योजना

 


"प्रधानमंत्री किसान योजना: किसानों के लिए राहत और समृद्धि का मार्ग"

Introduction:
प्रधानमंत्री किसान योजना (PM Kisan Yojana) भारत सरकार द्वारा किसानों को आर्थिक सहायता प्रदान करने के लिए शुरू की गई एक महत्वपूर्ण योजना है। इस योजना के तहत, छोटे और सीमांत किसानों को प्रतिवर्ष 6,000 रुपये की सहायता तीन समान किस्तों में प्रदान की जाती है। यह योजना किसानों की आय बढ़ाने और उन्हें आर्थिक संकट से उबारने में मदद करती है।

Key Features of PM Kisan Yojana:

  • योजना का उद्देश्य: किसानों को वित्तीय सहायता प्रदान करना ताकि वे कृषि कार्य में बेहतर तरीके से निवेश कर सकें।
  • लाभार्थी: छोटे और सीमांत किसान, जिनके पास 2 हेक्टेयर तक कृषि भूमि है।
  • आर्थिक सहायता: किसानों को प्रतिवर्ष 6,000 रुपये का भुगतान तीन किस्तों में।
  • ऑनलाइन आवेदन: किसान आसानी से ऑनलाइन आवेदन कर सकते हैं।

How to Apply for PM Kisan Yojana:

  1. सबसे पहले PM Kisan Official Website पर जाएं।
  2. "New Farmer Registration" पर क्लिक करें।
  3. अपना आधार कार्ड और अन्य जरूरी जानकारी भरें।
  4. आवेदन प्रक्रिया को पूरा करें और पुष्टि प्राप्त करें।

Conclusion:
यह योजना किसानों को बेहतर आर्थिक स्थिति की दिशा में एक बड़ा कदम है। यदि आप किसान हैं और इस योजना का लाभ लेना चाहते हैं, तो आज ही अपना पंजीकरण करें।



पीएम किसान योजना

Title:
"प्रधानमंत्री किसान योजना: शेतकऱ्यांसाठी आर्थिक सहाय्य आणि समृद्धीचा मार्ग"

Introduction:
प्रधानमंत्री किसान योजना (PM Kisan Yojana) भारत सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेतून छोटे आणि सीमांत शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. हे सहाय्य तीन हप्त्यांमध्ये दिले जाते आणि शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी वित्तीय मदतीचे स्वरूप असते.

PM Kisan Yojana चे मुख्य वैशिष्ट्ये:

  • योजनेचा उद्देश: शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करून त्यांना शेतीमध्ये अधिक गुंतवणूक करण्याची संधी देणे.
  • लाभार्थी: 2 हेक्टरांपर्यंत शेती असलेले छोटे आणि सीमांत शेतकरी.
  • आर्थिक सहाय्य: प्रत्येक शेतकऱ्याला वर्षाला 6,000 रुपये सहाय्य तीन हप्त्यांमध्ये.
  • ऑनलाइन अर्ज: शेतकरी ऑनलाइन अर्ज करू शकतात.

PM Kisan Yojana साठी अर्ज कसा करावा:

  1. PM Kisan Official Website वर जा.
  2. "New Farmer Registration" वर क्लिक करा.
  3. आपला आधार कार्ड आणि आवश्यक माहिती भरा.
  4. अर्ज प्रक्रिया पूर्ण करा आणि पुष्टी मिळवा.

Conclusion:
प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या कामासाठी अधिक आर्थिक मदत पुरवते. जर तुम्ही शेतकरी असाल तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच अर्ज करा.

पात्रता :

  • Pradhan Mantri Kisan Sanman Nidhi या योजनेसाठी ज्या शेतकऱ्यांकडे १ फेब्रुवारी २०१९ पूर्वी लागवडीयोग्य जमीनिची मालकी आहे असे सर्व शेतकरी कुटुंब या योजनेसाठी पात्र आहेत( सुरुवातीला ५ एकर पर्यंत लागवडीयोग्य जमीन असणाऱ्याच शेतकरी कुटुंबाला लाभ दिला जायचा पुढे ही अट शिथिल करून ५ एकर पेक्षा जास्त जमीनिची मालकी असणाऱ्या शेतकरी कुटुंबांचा समावेश या योजनेत केला.)
  • एका कुटुंबात एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळतो. कुटुंबाची व्याख्या शासनाने नवरा, बायको आणि त्यांची १८ वर्षे वयाच्या आतील अपत्ये अशी केली आहे. उदा. नवरा, बायको आणि त्यांची १८ वर्षे वयाच्या आतील अपत्ये यांच्या नावे जमीन असली तरी फक्त एकालाच या योजनेचा लाभ मिळेल. एखादे अपत्य वयाचे १८ वर्षे पूर्ण झाले असतील तर त्याचाही या योजनेत समावेश करून त्याला लाभ दिला जातो.
  • १ फेब्रुवारी २०१९ नंतर एखाद्या लाभार्थी शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या वारसांना या योजनेचा लाभ घेता येतो.
  • जमिनीची मालकी सामाईक असेल तर त्या जमिनीचा जास्त भाग ज्याच्या नावे असेल त्याच्या नावे लाभ दिला जातो. जर लागवडीयोग्य जमीन कुटुंबातील दोन किंवा दोनपेक्षा जास्त सदस्यांच्या नावे समान प्रमाणात असेल तर वयाने मोठ्या सदस्याला योजनेचा लाभ दिला जातो.
  • शेतकरी असण्याच्या पात्रतेची cut-off Date १ फेब्रुवारी २०१९ आहे आणि या तारखेत पुढील ५ वर्षे कुठलाही बदल विचारात घेतला जाणार नाही.
  • ईशानेकडील काही राज्यामध्ये आणि झारखंड राज्यात पात्रतेच्या अटी वेगळ्या आहेत.

e-KYC कशी करावी ?

          e-KYC म्हणजे electronically Know Your Client. कोणत्याही मध्यस्थांच्या सहभागाशिवाय Pradhan Mantri Kisan Sanman Nidhi योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये पोहचेल याची खात्री करण्यासाठी  e-KYC करणे गरजेचे आहे. e-KYC दोन पद्धतीने करू शकतो –

  • https://pmkisan.gov.in/ या शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन उजव्या बाजूचा e-KYC हा पर्याय निवडावा. यासाठी लाभार्थ्याच्या आधार कार्ड शी मोबईल लिंक असणे अवश्यक आहे.
  • आधार शी मोबाईल लिंक नसल्यास जवळच्या CSC केंद्रावर (सेतू) जाऊन Biometric पद्धतीने आधार प्रमाणीकरण केले जाते.

लाभार्थी स्थिती कशी पाहावी ?

https://pmkisan.gov.in/  या शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन उजव्या बाजूचा Know Your Status हा पर्याय निवडावा. लाभार्थ्याला Pradhan Mantri Kisan Sanman Nidhi योजनेचे किती हप्ते मिळाले , किती तारखेला मिळाले याबद्दल माहिती मिळते. तसेच काही कारणाने लाभ मिळण्यात अडचण आल्यास त्याचा तपशील येथेच कळतो.

गावातील लाभार्थी यादी कशी पाहावी ?

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन Beneficiary List हा पर्याय निवडावा. पुढील माहिती भरून हव्या त्या ठिकाणची सदरील योजनेची लाभार्थी यादी पाहण्यास मिळेल.

Pradhan Mantri Kisan Sanman Nidhi योजनेचा लाभ मिळत होता परंतु आता लाभ मिळत नाही याची खालील काही करणे असू शकतात –

  • जमिनीची माहिती अद्ययावत नसणे.

यासाठी जमिनीचे उतारे घेऊन तहसिल कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांना जाऊन भेटावे , ते सांगतील त्या गोष्टी पूर्ण कराव्यात.

  • e-KYC केलेली नसणे.

eKYC कशी करावी ? या मुद्यात सांगितल्याप्रमाणे कार्यावाही करावी.

  • आधार कार्ड सोबत बँक खाते संलग्न नसणे .

शासनाचे आधार शी संलग्न माहितीच्या आधारेच योजनेचा लाभ दिला जाईल असे धोरण असल्याने आधारसोबत बँक खाते संलग्न असणे अतिशय गरजेचे आहे. सदरील त्रुटी दोन पद्धतीने दुरुस्त केली जाऊ शकते –

  • लाभार्थ्याचे ज्या बंकेत खाते आहे त्या बँकेत जाऊन आधार कार्ड , बँक पासबुक ची झेरॉक्स आणि विहित नमुन्यातील अर्ज व्यवस्थित भरून संबंधित अधिकाऱ्यांना द्यावा. अधिकारी अर्जाची तपासणी करून लाभार्थ्याच्या खात्याशी आधार कार्ड लिंक करतील व NPCI mapper update करतील. अशाप्रकारे आधाराशी बँक खाते लिंक झाल्यावर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळण्यास सुरु होईल.
  • लाभार्थ्याने आपल्या जवळील पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन तेथील अधिकाऱ्यांना Pradhan Mantri Kisan Sanman Nidhi योजनेचे पैसे जमा होणारे खाते उघडून देण्याची विनंती करावी. पोस्ट अधिकारी इंडिअन पोस्ट पेमेंट बँकेचे (IPPB) खाते उघडून देतील व त्या खात्यात Pradhan Mantri Kisan Sanman Nidhi योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात होईल.

अवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड ( पती , पत्नी दोघांचेही )
  • आधार कार्डशी मोबाईल क्रमांक लिंक असावा.
  • रेशन कार्ड
  • सातबारा , ८ अ उतारे. 
  • जमीन नावे आल्याचा फेरफार.
  • विहित नमुन्यातील अर्ज. 

अपात्रता :

  • खालीलपैकी आर्थिक परिस्थिती प्रगत असणाऱ्या शेतकरी कुटुंबांना Pradhan Mantri Kisan Sanman Nidhi या योजनेतून वगळले आहे.
    1. सर्व संस्थात्मक जमीन धारक.
    2. असे सर्व शेतकरी कुटुंब ज्यातील एक किंवा एकापेक्षा जास्त सदस्य खालील प्रकारचे असतील –
      1. आजी किंवा माजी शासकीय पदाधिकारी.
      2. आजी किंवा माजी मंत्री / राज्य मंत्री , आजी किंवा माजी लोकसभा सदस्य / राज्यसभा सदस्य / विधानसभा सदस्य / विधानपरिषद सदस्य , महानगर पालिकेचे महापौर, जिल्हा परिषद सदस्य.
      3. शासकीय सेवेत असणारे किंवा सेवेतून निवृत्त झालेले अधिकारी आणि केंद्र/राज्य सरकारचे मंत्रालय / कार्यालय / विभाग / आणि त्यांचे क्षेत्रीय कार्यालये , सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि त्यांची कार्यालये , शासनाच्या स्वायत्त संस्था त्याचबरोबर पंचायत राज व्यवस्थेतील नोकरदार . (या अटीला Multi Tasking Staff / Class IV / Group D employees अपवाद असतील.)
      4. सर्व सेवानिवृत्त पेन्शन धारक ज्यांची पेन्शन १०,०००/- रु. किंवा त्यापेक्षा जास्त आहे. (या अटीला Multi Tasking Staff / Class IV / Group D employees अपवाद असतील.)
      5. मागील आर्थिक वर्षात आयकर भरला आहे अशा सर्व व्यक्ती.
      6. अधिकृत नोंदणी करून काम करणारे डॉक्टर , इंजिनीअर , वकील , सनदी लेखापाल ( Chartered Accountant ) , वास्तुविशारद ( Architects ).
    3. NRI – Non Resident Indians .

Comments

Popular posts from this blog

ITR efiling

राज्यात ‘लेक लाडकी योजना’ | Lek Ladki Yojana

ई-श्रम कार्ड